Sunil Shetty : लोकसभेच्या निवडणूकीचे वातावरण आता चांगले तापले असून सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी आता बॉलिवूडचे कलाकार देखील प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपुर्वीच गोविंदाने शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच गोविंदा शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे. आता बॉलिवूड मधील अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) देखील प्रचाराच्या मैदानात उतरला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांनी नुकताच चंद्रपुर मध्ये प्रचार केला. भाजप नेते आणि महायुतीचे चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी सुनील शेट्टी मैदानात उतरले आहे. सुनील शेट्टी यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी आज भद्रावती आणि वरोरा येथे रोड शो केला. तसेच मतदारांशी संवाद साधला.
सुनील शेट्टी यांच्या रोड शोला भद्रावती येथील स्व.बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून ते नाग मंदिरापर्यंत हा रोड शो झाला. या रोड शो दरम्यान, ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांना पंचारतीने ओवाळले तर पुष्पवृष्टी देखील केली.
काय म्हणाले सुनील शेट्टी ?
अभिनेते सुनील शेट्टी बोलताना, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा लोकनेता आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेला आहे, हे आपले भाग्य असून चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या सुरक्षित आणि उत्तम भविष्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन शेट्टी यांनी केले.
तसेच, लोकसभेची ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक असून भारताचे उज्वल भविष्य ठरविणारी आहे. यासाठी आपल्याला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच बघायचे असल्यामुळे भद्रावतीच्या जनतेने भविष्याचा विचार करून सुधीर मुनगंटीवार यांनाच मतदान करावे असे आवाहनही सुनील शेट्टी यांनी केले.
हे ही वाचा :
अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका
वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला
ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !
…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र
मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार
धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून
मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान
ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन
ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान