मुंबई (प्रतिनिधी) :-
राज्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे याच पार्श्वभूमीवर हाताळण्यासाठी केरळ सरकारकडे वैदकीय मदत मागितली आहे. राज्य सरकारने केरळकडे १५० डॉक्टर आणि नर्स पुरवण्याची मागणी केली आहे. रेसकोर्सवर ६०० खाटांचे विशेष कोव्हिड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. तिथे तब्बल १२५ खाटांचा ICU वॉर्ड असणार आहे. केरळहून येणाऱ्या एमडी अथवा एमएस डॉक्टरांना २ लाख, एमबीबीएस डॉक्टरांना ८० हजार आणि परिचारिकांना ३० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाकडून या संदर्भात पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत केरळ सरकारने वैद्यकीय मदत पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबईत नव्याने तयार करण्यात येत असलेल्या तात्पुरत्या हॉस्पिटलची जबाबदारी केरळचे डॉक्टर आणि परिचारिका सांभाळणार असल्याची माहिती मिळाली आहे.