पुणे (प्रतिनिधी):- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी. ठाकरे सरकार कोरोनाचे संकट हाताळू शकत नाही, त्यांच्यात क्षमता नाही. कोरोनाचा सामना करण्यास सरकार अपयशी ठरलं आहे. सध्या राज्यात रोजगार नाही, अन्नधान्याचा पुरवठा नाही, परिक्षा रद्द, लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद, सगळ्या गोष्टींवर स्थगिती इतकंच सरकारला जमतं. राज्य कसं चालवावं, पोलीस यंत्रणा कशी हाताळावी हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमत नाही, त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी आज राज्यापालांना भेटून केली. अशी माहिती नारायण राणेंनी फेसबुकच्या माध्यमातून दिली.
परंतु या मागणीवर नारायण राणे चांगलेच फसले आहे. त्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल चा सामना करावा लागतो आहे.
तर काहींनी फक्त महाराष्ट्रात का देशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.