Monday, May 20, 2024
Homeसमाजकारणकाडीवडगाव येथे कै.आबासाहेब बादाडे पाटील यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी

काडीवडगाव येथे कै.आबासाहेब बादाडे पाटील यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी

(वडवणी/प्रतिनिधी) तालुक्यातील काडीवडगाव येथील पहिले सरपंच के आबासाहेब रोहिदास बादाडे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त प्राथमिक ऊप आरोग्य केंद्र काडीवडगाव येथे रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, कोरोना जनजागृती शिबिर, आय एम सी विविध आजारावर माहिती अशा विविध कार्यक्रमाने पार पडला .

 

        या कार्यकमाचे अध्यक्ष म्हणुन बीड जिल्हा बँकेचे संचालक बाबरी मुंडे, तर उजघाटक म्हणून जि.प.सदस्य औदुंबर सावंत, लढा दुष्काळ टीमचे अध्यक्ष अँड. राज पाटील तर प्रमुख पाहुणे मच्छिंद्र झाटे, प्रा. सत्यप्रेम मगर, बजरंग साबळे , ज्ञानेश्वर सुरवसे, डॉ देवेंद्र थोटे, पत्रकार रामेश्वर गोंडे, अनिल बादाडे, श्री राम बादाडे, अमोल खळगे, दिपक आंबुरे, सरपंच बाळासाहेब राऊत, मोहन बादाडे, भगवान बादाडे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते.

   

          कार्यक्रमात प्रथम माँ जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज के आबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यामध्ये आपल्या अध्यक्षीय भाषणात बीड जि. बँकेचे संचालक बाबरी मुंडे म्हणाले की बादाडे पाटील परिवाराने त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त असामाजिक चांगला कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून  आभार व आम्ही हि सुरुवातीला वाढदिवसानिमित्त विपरीत खर्च करीत होतो परंतुज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रक्तदान शिबिर सारख्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत त्यामुळे आपल्या वडवणी तालुक्याचा रक्तदानात मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. जि.प. सदस्य औदुंबर सावंत प्रा सत्यप्रेम मगर प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर सुरवसे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते बाळासाहेब बादाडे यांनी केले व आभार भारत आप्पा बादाडे यांनी मानले .

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय