Monday, May 20, 2024
Homeशिक्षणलोकमान्य टिळक महाविद्यालयात ई - चर्चासत्राचे आयोजन

लोकमान्य टिळक महाविद्यालयात ई – चर्चासत्राचे आयोजन

(वडवणी/प्रतिनिधी) वडवणी शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात दिनांक ४ जुलै २०२० रोजी ई – चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे ,यासाठी संपूर्ण देशातून वेगवेगळ्या राज्यामधून २०० लोकांची ऑनलाइन नोंदणी झालेली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एम.पवार यांनी दिली.

 

            लोकमान्य टिळक महाविद्यालयात वाणिज्य विभागामध्ये राष्ट्रीय स्तरावर ई – चर्चासत्र ४ जुलै २०२० रोजी  ” आत्मनिर्भर भारत ” या विषयावर  होणार आहे. यामध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यातील विचारवंत आपले विचार व्यक्त करणार आहेत.  डॉ. रमन कुमार तिवारी बिहार विद्यापीठ डॉ.नीलेश शर्मा ग्वाल्हेर विद्यापीठ डॉ. सविता जोशी सरस्वती भूवन कॉलेज औरंगाबाद प्रा. प्रमोद वडते सीईओ इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी पुणे श्री. प्रवीण घुगे अध्यक्ष बालआधिकार संरक्षण मंडळ महाराष्ट्र शासन,हे या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.

        या ” आत्मनिर्भर भारत ” चर्चासत्राचे मुख्य आयोजक प्राचार्य डॉ. के. एम .पवार निमंत्रक डॉ. पी .बी .भोसले यांनी केले आहे. सदर चर्चासत्र गुगल मीट या ॲपवर ऑनलाइन होणार आहे वेळ सकाळी १० ते २:०० आहे. Link : https://meet.google.com/fuz-botn-avy या लिंकवर चर्चासत्रात देशातील, राज्यातील, आणि बीड जिल्ह्यातील सर्व बुद्धिवंतांनी सहभागी व्हावे असे अावाहन  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एम. पवार, डॉ. पी. बी. भोसले यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय