Friday, November 22, 2024
Homeशिक्षणशासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाची सीईओंकडे तक्रार

शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाची सीईओंकडे तक्रार

(वडवणी/प्रतिनिधी) शालेय साहीत्य आणण्यासाठी मुलीच्या आजारपणात व्यस्त असलेल्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाची ६१ हजार रुपयांच्या चेकवर गरबडीत सही घेतली.व तो शासकीय निधी परस्पर उचलचन गैरव्यवहार केल्यामुळे येथील केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या विरोधात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश यांनी सिईओ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

       

वडवणी येथील केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय फासे हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.आता तर त्यांनी वेगळेच काम करून प्रसिद्धीत येण्याचा प्रयत्न केला आहे.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाच्या डोळ्यात चक्क धूळ फेकून शालेय साहीत्य आणायचे आहे म्हणुन ६१ हजार रुपयाच्या को-या चेकवर सही घेतली.आणि बँकेतुन मिळालेल्या निधीचा स्वतःच्या कामासाठी गैरवापर केला.उचललेला निधी कुठे खर्च केला व शाळेत नेमके काय आणले हे पाहण्यासाठी मुलीच्या आजारपणातून मुक्त झाल्यानंतर अध्यक्ष राजेश उजगरे हे शाळेत गेले व संबंधित मुख्याध्यापक दत्तात्रय फासे यांना विचारले.व उचललेली रक्कम पुन्हा शाळेच्या बँक खात्यावर भरु टाका असे म्हणले असता उलट अध्यक्षाला अर्वाच्य भाषा वापरुन ‘तुला काय करायचे ते करून घे’ माझे कोणीही वाकडे करू शकत नाही असे म्हणून दमदाटी केली.

   

सदरील शाळेचे मुख्याध्यापक श्री फासे हे अत्यंत दारूच्या व्यसनी गेलेले असून ते दारू पिऊन सतत शाळेत येत असतात.कोणत्याही प्रकारे कर्तव्य पार पाडत नसून उलट शाळेची बदनामी करतात.यामुळे शाळेची शैक्षणिक पात्रता ढासळत चालली आहे.तसेच शाळेचे मोठे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे.समाजामध्ये याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे.तरी वरिष्ठांनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सदरील मुख्याध्यापक दत्तात्रय फासे यांच्यावर खात्यांतर्गत चौकशी करून त्यांच्याविरुद्ध रीतसर शाळेच्या निधीचा अपहार केला म्हणून योग्य ती फौजदारी कारवाई करण्यात यावी.अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश उजगरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

————————————-

मुख्याध्यापक मंगळवारी निवृत्त होणार

————————————-

जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय फासे यांची शासकिय सेवा संपत आली असुन ते मुख्याध्यापक पदावरुन दिनांक ३० जुन रोजी निवृत्त होत आहेत.निवृत्त झाल्यावर कोणीही व काहीही केले तर काहीच होणार नाही म्हणुन त्यांनी हा गैरव्यावहार केला असावा अशी चर्चा आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय