Wednesday, December 4, 2024
Homeराज्यकंत्राटी, तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना लॉकडाऊन काळात तात्काळ वेतन द्या -...

कंत्राटी, तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना लॉकडाऊन काळात तात्काळ वेतन द्या – डॉ.भाऊसाहेब झिरपे

 औरंगाबाद(२१ मे): लॉकडाऊन काळात महाविद्यालये बंद आहेत. म्हणून तासीका तत्वावर व कंत्राटी तसेच विनाअनुदानित महाविद्यालयातील पुर्णवेळ प्राध्यापक कर्मचारी यांना वेतन किंवा मानधन मिळत नाही. तसेच इतर शिधकांचीही तसीच परिस्थीती झाली आहे. विनाअनुदानित  प्राध्यापक  तरुण शिक्षक कर्मचारी यांना मे महिन्यासह संपूर्ण लॉकडाऊन काळातील मानधन किंवा वेतन देण्यासाठी योग्यती खबरदारी घ्यावी. संस्था व अस्थापनांना तसे आदेश व योग्य ती मदत दिली जावी. 

           जेणेकरून उच्च शिक्षितांवर उपासमारीची वेळ येणार नाही. या अडचणीच्या काळात हे लोक नेहमी प्रमाणे इतर ठिकाणी कामेही करू शकत नाहीत. म्हणून राज्यातील सर्व शिक्षक प्राध्यापक कर्मचाऱ्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी तात्काळ मानधन किंवा वेतन मिळावे अशी मागणी माकपचे डॉ भाऊसाहेब झिरपे यांनी उच्च शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय