Friday, May 3, 2024
Homeराज्यतृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याची SFI ची मागणी

तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याची SFI ची मागणी

                      

जुन्नर (प्रतिनिधी):

        सध्या दिवसेंदिवस देशात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, याच पार्श्वभूमीवर आपण प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना दिलासा दिला परंतु, आपण सर्व जाणतो आहोत कि तृतीय वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असते, परंतु सध्याची परिस्थिती पाहता UGC च्या मार्गदर्शक तत्वानुसार सुद्धा तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे फार कठीण आहे.                कोरोनाच्या भीतीने शहरात शिकणाऱ्या राज्यातील आणि परराज्यातील विद्यार्थ्यांनी घर गाठले आहे, कोरोनाची भीती आणि त्यात परीक्षेचा मानसिक ताण विद्यार्थ्यांवर येतो आहे, त्याची पालकांना चिंता होत आहे, तसेच जून पासून पाऊस पडण्यास सुरुवात होत असती, लॉकडाऊन आणि वाहतूक व्यवस्था बंद असल्याने, परीक्षा काळात सामाजिक अंतर राखणे, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा अशा विविध कारणास्तव परीक्षेच्या काळात परराज्यातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होऊ शकतात त्यामुळे प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसारखे तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षे संबंधी योग्य ती भूमिका घेऊन त्यांना दिलासा देण्याची मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) जुन्नर तालुका समितीने केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय