Thursday, December 5, 2024
Homeराज्यविधी अभ्यासक्रम प्रवेशपरीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ करण्याची सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची मागणी

विधी अभ्यासक्रम प्रवेशपरीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ करण्याची सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची मागणी

प्रतिनिधी :- विधी अभ्यासक्रम प्रवेशपरीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने केली आहे.

            महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचलनालय या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विधी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेच्या ऑनलाइन निवेदनाची अंतिम दिनांक ३० मे २०२० होती. मात्र राज्यभरात अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता आले नाही. 

       राज्यभरात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदी असल्यामुळे सर्वच भागात साबयर कॅफे बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करता आलेले नाहीत. प्रवेश परीक्षेची ऑनलाइन साईट मोबाईल डिव्हाइसमध्ये उघडत नसल्याने विद्यार्थ्यांना पर्यायाने सायबर कॅफे अवलंबून राहावे लागते. साधन उपलब्ध नसलेल्या गरीब, ग्रामीण , दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अर्ज करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे विधी अभ्यासक्रम प्रवेशपरीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय