Saturday, May 18, 2024
Homeताज्या बातम्याअमेरिकेच्या नासा पर्यंत धडक मारणारा मराठमोळा वैज्ञानिक अखेरपर्यंत आपल्या जन्मभूमीच्या ऋणात राहिला;...

अमेरिकेच्या नासा पर्यंत धडक मारणारा मराठमोळा वैज्ञानिक अखेरपर्यंत आपल्या जन्मभूमीच्या ऋणात राहिला; डॉ. सुभाष देसाई यांचे उद्गार.

ज्येष्ठ अवकाश संशोधक डॉ. आर. व्ही. भोसले यांना सोनाळी या जन्मगावी आदरांजली सभा.

प्रतिनिधी :- ज्येष्ठ अवकाश संशोधक डॉ. आर. व्ही. भोसले यांना सोनाळी, गारगोटी या जन्मगावी आदरांजली वाहण्यात आली.

             सोनाळी या छोट्याशा गावाशी जन्माचे नाते असलेले आणि देशातील पहिली रेडिओ टेलिस्कोपिक दुर्बिन बनवणारे आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ अवकाश संशोधक डॉक्टर राजाराम विष्णू तथा आर. व्ही. भोसले  यांनी आपल्या पासपोर्टवर  “जन्मस्थान सोनाळी” अभिमानाने मिरवले. देशातच नव्हे तर परदेशात आणि अमेरिकेच्या नासा पर्यंत धडक मारणारा मराठमोळा वैज्ञानिक अखेरपर्यंत आपल्या जन्मभूमीच्या ऋणात राहिला, असे भावपूर्ण उद्गार डॉ. सुभाष देसाई यांनी काढले.

            गारगोटीच्या शाहू वाचनालयाच्या सभागृहात डॉक्टर भोसले यांना आदरांजली वाहण्यासाठी गारगोटीतील नागरिकांनी शोकसभेचे आयोजन केले होते. कोरोना आणि सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळत ही छोटेखानी शोक सभा पार पडली. या सभेत डॉक्टर देसाई बोलत होते.  

              यावेळी यावेळी बाळ काका देसाई, डॉक्टर अर्जुन कुंभार, डॉक्टर राजीव चव्हाण, नंदकुमार मोरे, किशोर आबिटकर, प्राचार्य सुभाष देसाई आदींची  आदरांजली वाहण्यात  आली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय