मुंबई(२३ मे):- डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया राज्य समितीच्या वतीने विविध, शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठात कंत्राटी व अतिथी व्याख्याता, तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या शिक्षक, प्राध्यापकांना लॉकडाऊनच्या काळातील मानधन संबंधित शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाकडून अदा करण्याची मागणी आम्ही २६ एप्रिल २०२० ला मुख्यमंत्री कार्यालयाला ई-मेल द्वारे केली होती आणि त्या ई-मेल ला त्यांच्या कार्यालयाकडून पुढील कार्यवाहीसाठी २८ एप्रिल ला उत्तर सुद्धा आले होते. पण अद्याप त्यावर काही हि कार्यवाही झालेली नाही. लॉक डाऊन पासून सर्व शैक्षणिक संस्था बंद असल्याने सर्व कंत्राटी, हंगामी तासिका तत्त्वावरील शिक्षक, प्राध्यापक यांना उत्पन्नाशिवाय तीव्र संकटाचा सामना करावा लागत आहे.
आज देशाला घडवणारे शिक्षक, प्राध्यापक एक मोठी महत्वाकांक्षा घेऊन शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादन करून नोकरी अभावी पदरी पडले तेच पवित्र झाले या मानसिकतेतून कार्यरत आहेत. योग्यता, पात्रता, शैक्षणिक आर्हता असूनही आयुष्यातला कमवता आणि उमेदीचा काळ केवळ उदरनिर्वाह आणि कौटुंबिक जबाबदारी पोटी कंत्राटी आणि तासिका तत्वावर काम करणे नाईलाजास्तव स्विकारले. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया कंत्राटी व तासिका तत्वाच्या पद्धतीविरोधात कायमचं विरोधात आलेली आहे. कारण यामध्ये कायमचं असुरक्षितता असते आणि पुरेसं मानधन किंवा पगारही मिळत नाही. पण सद्य व्यवस्थेत अडकलेल्या या शिक्षक व प्राध्यापकांना कुठलाच पर्याय नाही.
मदतीसाठी कुणाकडे याचना ही करू न शकण्याऱ्या त्यांच्या या गंभीर परिस्थितिचा विचार करून त्यांना आर्थिक मदत मिळणे अत्यावश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने मानधन देण्याची व्यवस्था करावी अशी न्याय हक्काची मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया(Dyfi) ने महाराष्ट्र राज्य सरकारकडे केली आहे.
http://chng.it/4chCZLHD