Friday, November 22, 2024
Homeराज्यकामगार संघटना कृती समितीच्या वतीने पंतप्रधानांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन

कामगार संघटना कृती समितीच्या वतीने पंतप्रधानांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन

 नाशिक(२२मे):कामगार संघटना कृती समितीच्या वतीने पंतप्रधानांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल.कराड, आयटकचे राजू देसले आदी उपस्थित होते.

 आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

* केंद्र राज्य सरकारांनी कामगार कायदे स्थगित करण्याचे तसेच कामगार कायदे बदलण्याचे निर्णय रद्द करावेत.

* कामाचे तास पूर्वीप्रमाणेच आठ तास करण्यात यावेत, लॉक डाऊन कालावधीचे वेतन कामगारांना विना-कपात अदा करा.

* लॉक डाऊन मुळे अडकलेल्या कामगार व नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याची पुरेशी व्यवस्था करावी,त्यांना अन्न पाणी व औषध उपचार औषधोपचाराची व्यवस्था करावी.

* आयकर लागून नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला साडेसात हजार रुपये थेट रोख मदत द्यावी, सर्व गरजूंना रेशन दुकानातून स्वस्त अन्नधान्य व व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, महागाई भत्ता गोठविण्याचा निर्णय रद्द करा.

* सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी व व्यवस्थेसाठी जी.डी.पीच्या ५% खर्च करा.      

संबंधित लेख

लोकप्रिय