Sunday, May 19, 2024
Homeराजकारणसीटू संघटनेच्या वतीने तहसिल कार्याल्यासमोर धरणे आंदोलन. तहसिलदार मार्फत देशाचे पंतप्रधान...

सीटू संघटनेच्या वतीने तहसिल कार्याल्यासमोर धरणे आंदोलन. तहसिलदार मार्फत देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठवले निवेदन.

(धारूर/प्रतिनिधी) संपुर्ण देशामध्ये व राज्यामध्ये महाराष्ट्र कृती समितीच्या वतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले याचाच एक भाग म्हणून धारूर तहसिल कार्यालयासमोर सीटू संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या बाबत सविस्तर असे की, आज देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये कामगार संघटनानी संप पुकारला आहे. त्या धरतीवर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर कामगार विरोधी कामगार कायदे रद्द झाले पाहिजे,

रेल्वेचे खाजगीकरण थांबले पाहिजे, लॉक डाऊनच्या काळामध्ये असंघटीत सर्व कामगांराना १०,००० रु. अनुदान तात्काळ वाटप करा, आयकर लागु नसनाऱ्या सर्व कांमगांराना ७५०० रू. महिना द्या, आशा, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कामगार, बांधकाम कामगार, घरकामगार, ग्रामरोजगार सेवक यांना किमान वेतन २१,००० रू. द्या, मनरेगाची कामे तात्काळ सुरू करून त्यांना ६०० रु. रोज द्या, शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफ करुन त्यांना पिक कर्ज तात्काळ द्या, एप्रील, मे व जुन चे शालेय पोषण आहार कामगारांचे मानधन तात्काळ वाटप करा इत्यादी सह अनेक मागण्याचे निवेदन तहसिलदार यांना दिले. यावेळी सोशल डिस्टींगचे सर्व नियम पाळून आंदोलन करण्यात आले.

या वेळी बीड जिल्हा सीटू संघटनेचे जिल्हा सचिव कॉ.डॉ.अशोक थोरात, शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या जिल्हा सहसचिव कॉ.साै.मिरा शिंदे, साै. वैशाली आरसुळ यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. या वेळी रेखा डोंगरे, शोभा सोळके, लता खेपकर, भागीर्थी पंतगे, गंगा तिडके, सुमित्रा डोईफोडे, सुजाता खेपकर, कौश्यल्या शिंदे, सरला कांबळे, गंगा फडताडे, शिवकन्या  शिराळे, सुरेखा पंचाळ इत्यादी सह अनेक महिला कामगार उपस्थित होत्या. आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ. संजय घोगरे, कॉ. शिवाजी आडसुळ, किशन मुढाळ, नवनाथ वाव्हळ, बालासाहेब पवार, लक्ष्मण डोंगरे यांनी अथक परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय