कराड(२४ मे) :- निसर्गाची आवड आणि एक सामाजिक कर्तृत्व जपण्याचे काम कराडमधील ‘निसर्ग ग्रुप’ करत आहे. गेले अनेक महिन्यांपासून निसर्ग ग्रुपवर कराडजवळील आगाशिवच्या गडावरील काही झाडांना पाणी घालण्याचे काम करतात. तसेच पक्षांसाठी बनवलेल्या वॉटर फिडर मध्येही पाणी घातले जाते.
लॉकडाऊनच्या दोन महिन्यानंतर निसर्गसेवेला परत सुरूवात झालेली आहे. मागील दोन महिने झाडांना पाणी न मिळाल्याने काही झाडे वाळत आहेत. तरी शक्य तेवढया झाडांना पाणी घालूयात त्यामुळे त्या झाडांना नव्याने पालवी फुटेल असे निसर्ग ग्रुपने म्हटले आहे. या निसर्गसेवेत चैतन्य रैनाक आणि दीपक रायबागी सहभागी झाले होते.