Monday, May 20, 2024
Homeग्रामीणकम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.अरुण शेळके यांचे निधन

कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.अरुण शेळके यांचे निधन

प्रतिनिधी :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा.डॉ. अरूण शेळके यांचे आजाराने निधन झाले. ते ७० वर्षाचे होते. डॉ. विठ्ठल मोरे व उद्धव भवलकर यांच्यासोबत मराठवाड्यातील आणि महाराष्ट्र एसएफआय चे एक संस्थापक सदस्य होते. त्यांच्या कळंब या गावात १९७५ साली एसएफआय चे पहिले राज्य अधिवेशन झाले. नंतर त्यांनी डीवायएफआय मध्ये काम केले. कम्युनिस्ट पक्षाचे उस्मानाबाद जिल्ह्यातील ते नेते होते.

           मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी दु:ख व्यक्त केले असून ते म्हणाले, ” एसएफआय, डीवायएफआय बरोबरच १९९३ मध्ये लातूर येथे झालेल्या राज्य अधिवेशनाच्या यशात त्यांचाही मोठा वाटा होता. किसान सभेत काम करताना ते अनेक वर्षे जिल्हा अध्यक्ष होते. कॉ. अरुण शेळके अनेक वर्षे पक्षाचे उस्मानाबाद जिल्हा सचिव होते. कळंबमध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत असतानाच त्यांनी अनेक चांगल्या शिक्षणसंस्था बांधल्या. कॉ. अरुण शेळकेंच्या निधनाने एक अतिशय कार्यक्षम आणि निष्ठावंत नेता आपल्या पक्षाने गमावला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच जिल्ह्याचे कॉ. मोहन शिंदे यांच्या निधनामुळे उस्मानाबाद जिल्ह्यावर दुहेरी आघात झाला आहे.”

         एसएफआय राज्य सरचिटणीस रोहिदास जाधव यांनी दु:ख व्यक्त केले असून ते म्हणाले, “एसएफआय उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. १९७० ते १९७५ हा संघटनेचा सुरुवातीचा काळ होता. त्या काळात एसएफआयच्या नेतृत्वाखाली झालेले मोर्चे-आंदोलन व संघटन बांधणी हे पुढील काळात संघटनेला सर्वोच्च स्थानावर नेणारे ठरले. म्हणून शेळके सर यांनी इतर सहकाऱ्यांसोबत एसएफआयची पायाभरणी केली आहे. आज राज्यातील अनेक भागात एसएफआय पोहोचली, वाढली आणि अजूनही विस्तारत चालली आहे. यात शेळके सरांचे योगदान जरूर आहे. ते एसएफआय कधीच विसरणार नाही. 

             उस्मानाबाद जिल्ह्यातील चळवळीचा आधारवड हरपल्याची भाव कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय