Monday, May 13, 2024
Homeसमाजकारणभालेरावांचे विचार आणि कार्य शेवटच्या श्वासापर्यत तेवत ठेवणार - बाबासाहेब साळवे ...

भालेरावांचे विचार आणि कार्य शेवटच्या श्वासापर्यत तेवत ठेवणार – बाबासाहेब साळवे विविध समाजिक उपक्रम राबवून रिपाई नेते ॲड.गौत्तम भालेराव यांची जयंती साजरी

(वडवणी/प्रतिनिधी) रिपाईचे राष्ट्रीय महासचिव आणि दिवंगत लोकनेते ॲड.गौत्तम भालेराव यांचे समाजिक आणि राजकिय कार्य अफाट आहे म्हणुनच त्यांचे विचार आणि कार्य शेवटच्या श्वासापर्यत जनमाणसांची सेवा करत आसताना तेवत ठेवणार आहे.अशी आशा  भालेराव मित्र मंडळाचे बीड जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळवे यांनी व्यक्त केली आहे.

        रिपाईचे दिवगंत लोकनेते ॲड.गौत्तम भालेराव यांची काल पहिली जयंती काल वडवणी शहरात विविध समाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली यामध्ये सर्वप्रथम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमेला आभिवादन करण्यात आले यानंतर भालेराव यांच्या प्रतिमेला हार,फुल वाहून आभिवादन करण्यात आले.तर रिपाईचे प्रदेश उपध्यक्ष डॉ.सिध्दार्थ भालेराव यांच्या सुचनेवरुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

       या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन शिक्षक मधू राठोड तर कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते तथा उद्योजक राहूल घाडगे प्रमुख पाहुणे म्हणुन मित्र मंडळाचे बीड जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळवे,समाजिक कार्यकर्ते एन.के.उजगरे यांची उपस्थिती होती.तर यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वडवणी व ग्रामीण रुग्णालय चिंचवण येथील रुग्ण व नातेवाईकांना ५०० मास्क व फळवाटप करण्यात आले.तर तहसिल,आरोग्य विभागासह ३१ झाडांचे वृक्षारोपण व संगोपन करण्यात येणार आहे तसेच ३१ गरजुवंताना किराणा व धान्याचे वाटप करण्यात आले आहे.तर हे सर्व कार्यक्रम कोविड १९ या कोरोना महामारी विषाणुचे नियम पाळत व मा.जिल्हाधिकारी यांच्या सुचनेचे पालन करत सोशिअल डिस्टंन्स पाळत कार्यक्रम घेण्यात आले आहेत.तर पुढे बोलताना बाबासाहेब साळवे म्हणाले कि,आज घडीला दादा हावे होते.परंतु दुदैवाने आज त्यांची जड अंत करणाने जयंती साजरी करावी लागत आहे.दादा आमच्यामधून गेले असले तरी त्यांचे कार्य,विचार आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्यासाठी चळवळ अंगाने सोडून गेले असले तरी मी शेवटच्या श्वासापर्यत त्यांचे कार्य आणि विचार समाज सेवेच्या मध्यमांतून कायम तेवत ठेवणार आहे.असे मत व्यक्त केले आहे.

       यावेळी जिल्हासचिव सचिन कसबे,तालुकाध्यक्ष बाबा डोंगरे,जिल्हाउध्यक्ष वैजेनाथ डोंगरे,युवा नेते आशोक मुजमुले,सजंय साळवे,अविष्कार सौंदरमल,रंगनाथ गायकवाड,रमेश झोडगे,प्रसाद झोडगे,हकीम शेख,गौत्तम झोडगे,आमोल मुजमुले यांच्या अन्य कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय