Monday, May 20, 2024
Homeआरोग्यकोरोनामुख्यमंत्र्यांच्या धाडसामुळेच ८६२ कोरोना मृत्यूंची नोंद :- मुंबई पालिका आयुक्त

मुख्यमंत्र्यांच्या धाडसामुळेच ८६२ कोरोना मृत्यूंची नोंद :- मुंबई पालिका आयुक्त

मुंबई (प्रतिनिधी) :-

        मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील मुंबईकरांप्रती असलेला प्रामाणिकपणा आणि धाडस यामुळेच मला चार दिवसात नोंद नसलेल्या ८६२ कोरोना मृत्यूंचे विश्लेषण करता आले अशी कबुली मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. एका खासगी रु्ग्णालयात एकाच दिवशी १६ मृत्यू झाल्याची माहिती मला आकडेवारीवरून दिसली. ६ जूनच्या त्या आकडेवारीमध्ये काहीतरी गडबड असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर सहआयुक्त आशुतोष सलिल आणि अतिरिक्त् आयुक्त सुरेश काकाणी यांच्या सोबत माहिती घेतली असता त्या खासगी रु्ग्णालयात ६ जून रोजी एकच मृत्यू झाला होता. मात्र दाखवण्यात आलेले मृत्यू अगोदरच्या काळातील होते हे मला दोघांकडून समजले.

         मुंबईत आजच्या दिवशी कोरोनाचे सुमारे ६० हजार रुग्ण असले तरी यातील प्रत्यक्षात रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याची गरज असलेल्यांची संख्या कमी आहे. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास पालिकेकडे आजच्या दिवशी सर्व रुग्णालयात मिळून ११,५४८ खाटा उपलब्ध आहेत तर ९५४५ रुग्ण दाखल आहेत. तर सुमारे १५०० खाटा मोकळ्या आहेत. अतिदक्षता विभागात खाटा मिळत नाही अशी तक्रार होती परंतु आजच्या दिवशी आमच्याकडे आयसीयूच्या ११६३ खाटा असून त्यापैकी २१ खाटा रिकाम्या आहेत. ऑक्सिजन ची व्यवस्था असलेल्या ५६१२ खाटा असून आजच्या दिवशी यातील ४३१५ खाटांवर रुग्ण दाखल असून १२९७ खाटा रिकाम्या आहेत.

          डेथ ऑडीट कमिटीपुढे मुंबईतील कोरोना मृत्यूची माहिती वेळेत न आल्याची अनेक कारणे असतील. कोरोनाच्या काळात डॉक्टर व वैद्यकिय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली, क्वारंनटाईन व्हावे लागले. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांवरच कामाचा ताण पडला असल्ायची शक्यता आहे. माझ्यापुढे जे आले ती माहिती आम्ही सार्वजनिक केली आहे. एखाद्या महामारीचा उद्रेक होणे अशी घटना शतकातून एकदाच होत असते. ही फार मोठी घटना असते. यामुळे या महामारीला कसे तोंड द्यावे याबद्द्ल आपण सगळे जण अन्नभिन्न असतो. मुंबईतील व राज्यातील इतर महापालिकेत कोरोना मृत्यू नोंदणीचा प्रकार घडला तसाच प्रकार इतर राज्यांमध्येही घडला असल्याची शक्यता आहे असेही ते म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय