पैठण : आषाढी एकादशी निमित्त संत एकनाथ महाराज यांच्या पादुकांचे आज एसटी बसने श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान झाले.
या वर्षी कोरोना महामारीच्या प्रभावामुळे संपूर्ण पालखी सोहळ्यावर प्रभाव पडला आहे.त्यामुळेच पादुका या एस टी बसने पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त गेल्या आहेत. सदर बस मध्ये पादुकांसोबत २० भाविक ज्यांचे वय ६० पेक्षा कमी आहे,अश्या भाविकांनाच जाण्याची परवानगी होती.
या भाविकांची कोरोना टेस्ट करून सोबत आधार कार्ड, ओळखपत्र व आरोग्य तपासणी केल्याचे प्रमाणपत्र बरोबर ठेवूनच जाण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. दरम्यान सर्वप्रकारच्या सुरक्षेसहित या बसने पंढरपूर कडे प्रस्थान केले असून रस्त्यामध्ये कोठेही न थांबता ही बस आज रात्रीपर्यंत पंढरपूर येथे पोहचेल, असे समजते.