Sunday, May 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

औरंगाबादमध्ये २४ तासात आणखी एका माजी नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू.

---Advertisement---

औरंगाबाद :  औरंगाबादमध्ये २३ तासात आणखी एका शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पडेगावचे माजी नगरसेवक यांचा एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. ८ दिवसापूर्वी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. घाटी रुग्णालयातून त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

---Advertisement---

२०१५ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ते शिवसेनेतर्फे निवडून आले होते. २३ जूनला त्यांनी स्वब दिला होता. २४ जूनला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती.

आज आणखी एका माजी नगरसेवकाचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाने कहर केल्याचे स्पष्ट होत आहे. दिवसेंदिवस बिघडती परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवहान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles