Friday, May 10, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट, राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड

मोठी बातमी : फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट, राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी बंड पुकारल्याने शिवसेना मोठा धक्का बसला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार देखील अडचणीत आले आहे. नुकतेच शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात आपण महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्याची याचिका दाखल केली आहे. अशात आता राज्यातील घडामोडींना वेग आला आहे.

राज्यातील सत्ता संघर्षात आता मोठी बातमी येत आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल, गिरीश महाजन, आशिष शेलार यांनी राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना भेट घेतली. या भेटीत भाजप नेत्यांनी राज्यपालांना बहुमत चाचणीची मागणी करण्यात आली आहे. भाजप नेते राजभवनावर पोहोचले असल्याने संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कि, शिवसेनेचे 39 आमदार राज्याबाहेर आहे, त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे फडणवीसांनी राज्यपालांकडे ठाकरे सरकारला बहुमत चाचणी करण्याची मागणी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय