Friday, November 22, 2024
Homeराज्यसोने भावात मोठी तेजी, सोने लवकरच नवीन विक्रम करण्याचा तज्ञांचा अंदाज

सोने भावात मोठी तेजी, सोने लवकरच नवीन विक्रम करण्याचा तज्ञांचा अंदाज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे, सोने सातत्याने रेकॉर्ड तयार करत आहे. तर चांदी विक्रमाच्या दिशेने आहे. गुंतवणुकीसाठी सोने (Investment in Gold) हे सर्वात सुरक्षित मानन्यात येते. त्यामुळे गुंतवणूकदार सध्या सोन्याकडे वळले आहेत. या पंधरवाड्यात सोन्याची मागणीही गगनाला भिडली आहे.

सोने आणि चांदीच्या भावाच्या बाबतीत येत्या काही दिवसांत ही परिस्थिती कायम राहिल्यास सोने आणि चांदी(Gold Silver Price Update) नवीन विक्रम करतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. सोने लवकरच 61,000 रुपयांचा टप्पा गाठू शकते, असेही त्यांचे मत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,७०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,६७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,७०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,६७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,७०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,६७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,७३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,७०० रुपये आहे.

सोन्या पाठोपाठ चांदीच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. चांदीचा कालचा भाव 73000 रुपये होता. आज हा भाव 73300 रुपये प्रति किलो होती. 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. अजून हा रेकॉर्ड मोडायचा आहे. त्यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी चांदी 73,300 रुपये किलो होती.

असे जाणून घ्या बाजार भाव
बाजार भाव माहिती करून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. या सोबतच तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

संबंधित लेख

लोकप्रिय