Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयराम मंदिराचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन, अयोध्या नगरी सज्ज

राम मंदिराचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन, अयोध्या नगरी सज्ज

अयोध्या:- अयोध्येत राम मंदिराचं उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमी पूजन होणार आहे. सुमारे पावणे दोनशे लोक त्यासाठी उपस्थित राहणार आहे. यामध्ये १३५ संत-महंतांचा समावेश आहे. भूमीपूजनासाठी अयोध्येत सजावटीसोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेट्स लावले आहेत. भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अनुष्ठानाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सहा तासांचं विशेष अनुष्ठान केलं जात आहे. आज सायंकाळी दीपोत्सव साजरा केला असून शरयू नदीचे घाट सुशोभित करण्यात आले आहेत.  दूरदर्शवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. 

अयोध्येत बाहेरच्या व्यक्तींना आधीच परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच अयोध्येतही चारपेक्षा जास्त लोक जमा होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. शहरातली मंदिरं आणि मशीद सुरु राहणार असून अयोध्येत उद्या भूमिपूजनाशिवाय कुठलाही धार्मिक विधी होणार नाही. 

या निमित्तानं राज्यात काही ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय