भंडारा / रफिक शेख : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पती – पत्नीमध्ये वाद होऊन, पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुयोगनगर राजे, दहेगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
स्नेहलता खांडेकर वय. 24 वर्ष असे मृतकाचे नाव असून लंकेश्वर खेमराज खांडेकर वय 34 वर्ष असे आरोपी पतीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपीने, दुसऱ्या दिवशी सकाळी जवाहरनगर पोलिस स्टेशन येथे पोहचून आत्मसमर्पण केले.
लंकेश्वर हा आयुध निर्माणीत जवाहरनगर येथील कँटीनमध्ये कुक म्हणून कामावर होता. विशेष म्हणजे पती-पत्नीच्या भांडणात 4 वर्षीय चिमुकलीचे मातृछत्र हरपल्याने ती अनाथ झाली आहे. आरोपी पती लंकेश्वर खांडेकर याला अटक करुन, त्याचे विरुद्ध जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरु आहे.