वडवणी (बीड) : वडवणी शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. एम.पवार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रातील पहिले वर्तमानपत्र दर्पण सुरू केले म्हणून त्यांचा जन्म दिवस ‘दर्पण दिन’, ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सतीश भालेराव, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. गोपीचंद घायतिडक, डॉ.बी.जी.कुलकर्णी, डॉ. सच्चिदानंद तांदळे, प्रा. अशोक खेत्री, प्रा. संजय साळुंके, प्रा. नागनाथ साळुंके, प्रा. जी. के. घोडेराव, प्रा. जी.बी. मस्के, प्रा. अंकुश पवार तसेच महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.