शेवगाव (अहमदनगर) : दर्पणकार आचार्य बाळशस्त्री जांभेकर यांच्या जयंतदिन निमित्ताने आज (दि.६) सर्व पत्रकार बंधू शेवगाव तालुका, यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
प्रकाश भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. पत्रकारिता व्यवसाय मधून पत्रकारांचा चरितार्थ चालत नसून एक सेवा त्यासाठी तडजोड करायची निड बीड वृत्ती मुळे समाज घडवण्याचे काम करत असतो. पत्रकारांना विश्वासात घेऊन त्यांनी आपले कार्य कसे करावे यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम संपल्यानंतर प्रकाश भंडारी यांनी निर्भीड पत्रकार म्हणून पुण्यनगरीचे सुभाष बुधवंत यांचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमात सामाजिक कार्याची दाखल घेऊन पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, या कार्यक्रमाला डॉ. सतीश घुले, प्रा.किसन माने, प्रकाश भंडारे, भाजप जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, चंद्रशेखर मुरदारे, मराठवाडा साथीचे पै.पानसरे सीबी, विजय जोशी, शाम् रोहित, कैलास बुधवंत, सचिन सातपुते, अनील खैरे, रवी उगलमुगले, ताजी खबरे अलीम शेख, संजय नांगरे, युसुफ शेख, सुभाष बुधवंत, विजय धनवडे, उपस्थित होते.