Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभोसरी येथील नारायण शिक्षण संस्थेच्या बालचमुची पालखी / ग्रंथदिंडी सोहळा उत्साहात संपन्न

भोसरी येथील नारायण शिक्षण संस्थेच्या बालचमुची पालखी / ग्रंथदिंडी सोहळा उत्साहात संपन्न

भोसरी : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या वारीचे वारे सुरू असताना अशा वातावरणात भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळेत गुरुवार दिनांक ७ जुलै २०२२ रोजी वारीचे व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

शालेय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर अध्यात्म, संत साहित्य, परंपरेची ओळख व्हावी, शालेय जीवनात भक्ती, शक्ती, विनम्रता, सहनशीलता, ही गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत, प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नसले तरी वारीचा अनुभव मात्र विद्यार्थ्यांना घेता यावा, भारतीय संस्कृतीची / संत परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील शिक्षकांनी स्वतः मेहनत घेऊन टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंपासून बनवलेली पालखी ही पालखीचे मुख्य आकर्षण होते. सुंदर पद्धतीने पालखी बनवण्यात आली होती. व सजविण्यात आली होती.

पालखीची / दिंडीची सुरुवात ग्रंथ व पालखीचे पूजन करून ह. भ.प. दिगंबर ढोकले, नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री -प्रायमरी विभागाच्या प्राचार्य विजया चौगुले व पालक / शिक्षण संस्थेचे संचालक यांच्या हस्ते करण्यात आले.

वारीला / दिंडीला पारंपारिक वारीचे स्वरूप यावे यासाठी दिंडीच्या मध्यभागी सजवलेली पालखी, मागे – पुढे वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी, नऊवारी साड्या परिधान करून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी, भगव्या पताका, गळ्यात टाळ, कपाळी गंध, टाळ मृदुंगाच्या गजरात भजनात दंग झालेले चिमुकले वारकरी उपस्थित सर्वांचे आकर्षण केंद्रबिंदू ठरले होते.

वारीमध्ये रिंगण सोहळा आयोजित करून जणू पंढरीचे दर्शन घडविले. फुगडी, गोल फेर धरून विठ्ठल नामाच्या गजरात, ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात रिंगण सोहळा पार पडला.

वारीत / दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई, ज्ञानदेव तुकाराम, एकनाथ यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. विठ्ठल नामाची शाळा भरली !! ग्यानबा तुकाराम!!, विठ्ठल विठ्ठल गजरी! अवघी दुमदुमली पंढरी!! चा जयघोष करीत पर्यावरण, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, आदींचे महत्त्व विशद करणाऱ्या घोषणा यामुळे परिसर दुमदुमून गेला होता.

दिंडीमध्ये भोसरी येथील गुरु विहार कॉलनी, मधील महिला भजनी मंडळाने विद्यार्थ्यांबरोबर सहभाग घेतला. आणि सुंदर भजनाचा आविष्कार सादर केला. त्यामध्ये भालचमू / पालक / उपस्थित रमून गेले होते. बालचमुची ही वारी / दिंडी पाहताना नागरिक / पालक भारावून गेले होते.

वारी सोहळ्यामध्ये वारीच्या समारोपप्रसंगी सुप्रसिद्ध प्रवचनकार ह. भ. प. दिगंबर ढोकले यांनी उपस्थिती यांना संबोधित केले. व शाळेचे आणि शिक्षण संस्थेचे भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमाचे संयोजन शाळेच्या प्राचार्य, विजय चौगुले, प्रतिभा तांबे, सायली संत, मीनल बागल, भाग्यश्री नगरकर, सुरेखाताई मुके, प्रवीण भाकड यांनी अतिशय मेहनत घेऊन केले. दिंडी कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक / पालक नारायण हट शिक्षण संस्थेचे संचालक, गृह संस्थेचे सभासद, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय