Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडB.Ed. अभ्यासक्रम होणार बंद, त्याऐवजी लागू होणार ४ वर्षांचा विशेष अभ्यासक्रम

B.Ed. अभ्यासक्रम होणार बंद, त्याऐवजी लागू होणार ४ वर्षांचा विशेष अभ्यासक्रम

पुणे : पुढील शैक्षणिक सत्र 2024-2025 पासून केवळ चार वर्षांच्या विशेष बी.एड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाणार आहे. बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (RCI) ने यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष बीएड अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. या अभ्यासक्रमांना आरसीआयकडून मान्यता देण्यात येते. आरसीआयने आपल्या परिपत्रकामध्ये संपूर्ण देशातील सुमारे 1000 संस्था आणि विद्यापीठे यांच्यासाठी हा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे असे स्पष्ट केलेय.

काय आहे विशेष बीएड अभ्यासक्रम?

विशेष बीएड अभ्यासक्रमामध्ये शिक्षकांना दिव्यांग मुलांना शिकवण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते. दिव्यांग मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये श्रवण, वाक्, दृष्टिदोष, मानसिक अपंगत्व इत्यादी अपंगांसाठी अभ्यासक्रम चालविला जातो. ज्या संस्थांना चार वर्षांचा एकात्मिक बीएड विशेष शिक्षण अभ्यासक्रम (एनसीटीईच्या चार वर्षांचा आयटीईपी अभ्यासक्रमासारखा) ऑफर करायचा असेल त्या पुढील शैक्षणिक सत्रासाठी अर्ज करू शकतील असे आरसीआयने म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय