Sunday, May 19, 2024
Homeराजकारणऔरंगाबाद : MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी संतप्त, हजारो विद्यार्थी...

औरंगाबाद : MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी संतप्त, हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर

औरंगाबाद : वाढत्या कोविड-१९ रुग्णांचे कारण पुढे करून राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे राज्य भरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. औरंगाबादमध्येही सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच व्हाव्यात ही विद्यार्थ्यांची मागणी होती. औरंगाबाद हे मराठवाड्याचे महत्त्वाचे केंद्रबिंदू असल्याने संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातून ही या ठिकाणी विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात. मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांतून रोष व्यक्त केला जात आहे. 

शहरातील मध्यवर्ती असलेल्या औरंगपुरा परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ हजारो विद्यार्थी जमले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सर्वच विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

यावेळी, सरकारने जर हा निर्णय मागे घेऊन परीक्षा नियोजित वेळेत घेतल्या नाहीत तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा SFI चे जिल्हा अध्यक्ष लोकेश कांबळे यांनी दिला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय