Friday, May 3, 2024
Homeग्रामीणक्रांति स्मृतीवनात आँगस्ट क्रांतीदिन साजरा; स्मृतीवृक्षांना केले अभिवादन.

क्रांति स्मृतीवनात आँगस्ट क्रांतीदिन साजरा; स्मृतीवृक्षांना केले अभिवादन.

विटा (ता.९ ) : बलवडी (ता.खानापूर ) येथील जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने क्रांती स्मृतीवनात आँगस्ट क्रांतीदिननिमित्त साजरा करण्यात आला. हुतात्म्यांच्या नावे लावण्यात आलेल्या स्मृतीवृक्षांना पुष्प वाहण्यात आले. 

यावेळी बी.डी. कुंभार म्हणाले, १९४२ साली इंग्रजांच्या  जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी आरंभ झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ९ आँगस्टला सुरूवात केली. स्वातंत्र्यांच्या इतिहासात या दिवसाला अन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. संपतराव पवार म्हणाले, तरुणांना  क्रांतिकारकाच्या आठवणी जाग्या राहाव्यात, यासाठी क्रांतिवनाची निर्मिती केली आहे. 

यावेळी राजवर्धन पवार या चिमुकल्याच्या हस्ते स्मृतीवृक्षांना पुष्प वाहिली. यावेळी जाधवनगर 

वायुसेना जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंतराव जाधव, आर.एन. कास्कर, देवकुमार दुपटे ,प्रा.प्रशांत पवार, जगन्नाथ पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय