Wednesday, January 15, 2025
HomeNewsमहाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

जुन्नर येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत कार्यकर्त्यांना जनसंपर्क वाढविण्याचे आवाहन

जुन्नर / हितेंद्र गांधी : देशातील इतर राज्यांत ईडी, एनआयए, सीबीआय, इन्कमटॅक्स आदी संस्था फारश्या जात नसून महाराष्ट्रात मात्र त्यांचे काम जोरात सुरू आहे. महाराष्ट्र सरकार दिल्लीच्या डोळ्यात सलत असल्यामुळे राज्यातील मंत्र्यांना अडचणीत आणून त्यांना नामोहरण करण्याचे काम कुणीतरी करतंय, असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. जुन्नर येथे आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की २० वर्षांपूर्वी झालेल्या जमीन व्यवहारात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत ते म्हणाले की त्या काळातही दिल्लीची कपटकारस्थाने सुरू असायचीच, पण महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीही झुकला नाही. याप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, आमदार अतुल बेनके यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

छत्रपती संभाजीराजे यांचे प्रकृती खालावली, उपोषण सुरूच

आग्या मोहळ मधमाशांचा विद्यार्थ्यांवर हल्ला, १ गंभीर तर ३० जखमी

याप्रसंगी पाटील यांनी कार्यकर्त्यांना जनसंपर्क वाढविण्याबाबत सूचना केल्या. ते म्हणाले की बूथ कमिटीचे सदस्य आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क वाढवावा. पेट्रोल, गॅस, किराणा वस्तूंचे भाव किती व कसे वाढले याबाबत चर्चा करा. त्यांच्या समस्या सोडवल्या तर पक्षाचे मतदान वाढून राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष बनू शकतो. 

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, पांडुरंग पवार, मोहित ढमाले, शाम माळी, सभापती विशाल तांबे, पक्ष निरीक्षक उज्वला शेवाळे, शहराध्यक्ष धनराज खोत, अनिलतात्या मेहेर, बाळासाहेब खिलारी, गणपत फुलवडे, अरुण पारखे, नगरसेवक भाऊ कुंभार, फिरोज पठाण, प्रवक्ते भाऊ देवाडे, सुमित परदेशी, सुरज वाजगे, भूषण ताथेड, मयूर महाबरे, अमोल लांडे, रोहन परदेशी, विकास दरेकर, ललित जोशी तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान पिडीसीसीच्या संचालिका पूजा बुट्टे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

विशेष लेख : भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिवस

जुन्नरला लाल दिवा मिळणार ?

जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना महाविकास आघाडीमध्ये मंत्रिपद मिळावे, अशी मागणी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी यावेळी केली. या मागणीला कार्यकर्त्यांनी घोषणा व टाळ्यांनी जोरदार समर्थन दिले. या मागणीवर पाटील म्हणाले की बेनके हे नव्या पिढीतील उमदे नेतृत्व असून त्यांना योग्यवेळी संधी मिळणार आहे.

पाटलांनी घेतली पदाधिकाऱ्यांची हजेरी

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याप्रसंगी पदाधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. त्यांनी तालुकाध्यक्ष, युवाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांना त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या विचारली. नंतर त्यांच्या कार्यकारिणीची संख्या पाहून त्यापैकी किती जण हजर आहेत, हे हात वर करायला सांगत उलटतपासणी केली. यावेळी पद मोठे असले तरी सोबत आलेल्या कार्यकर्त्यांची बोटावर मोजता येणारी संख्या, यामुळे काही पदाधिकाऱ्यांची गोची झाली.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये ११४९ जागांसाठी भरती, १२ वी पास विद्यार्थ्यांना संधी !

Kiss : चुंबनाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर


संबंधित लेख

लोकप्रिय