Tuesday, September 17, 2024
Homeग्रामीणआंबेगाव : पोखरकरवाडी येथील ग्रंथालयास शिवजयंतीचे औचित्य साधत पुस्तके भेट

आंबेगाव : पोखरकरवाडी येथील ग्रंथालयास शिवजयंतीचे औचित्य साधत पुस्तके भेट

घोडेगाव : साहित्यदिप वाचनचळवळ यांच्या वतीने, पोखरकरवाडी येथे सुरू होत असलेले कै. महेश ज्ञानेश्वर पोखरकर स्मरणार्थ वाचनालयास शिवजयंतीचे औचित्य साधत सुमारे 50 पुस्तके साहित्यदीप वाचन चळवळीच्या वतीने प्रदान करण्यात आली.

प्रा.सागर पारधी यांच्या हस्ते ही पुस्तके ग्रंथालयाचे व्यवस्थापक यांच्याकडे शिवजयंती दिनाच्या निमित्ताने सुपूर्त करण्यात आली.

यावेळी पोखरकरवाडी येथील ग्रामस्थ रामदास पोखरकर, भिका पोखरकर, निलेश पोखरकर, गणेश पोखरकर, महेश गुंजाळ, प्रशांत पोखरकर, किशोर गुंजाळ, याचबरोबर आदीम संस्थेचे नंदन लोंढे, दिव्या जाधव, भारती बाळापुरे इ.उपस्थित होते.

साहित्यदीप वाचन चळवळीच्या वतीने आपटी, घोडेवाडी (बोरघर), फुलवडे, थुगाव, न्हावेड, अवसरी खुर्द येथे या अगोदरच ग्रंथालये सुरू करण्यात आली आहेत.

साहित्यदीप वाचन चळवळीचे पदाधिकारी जीएसटी उपायुक्त महेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वायाळ, उद्योजक विजय केंगले आणि डॉ.अमोल वाघमारे यांनी यापुढे ही “गाव तेथे ग्रंथालय” ही मोहीम सुरू ठेवण्याचा निर्धार केलेला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय