पुणे : दहशतवादी विरोधी पथकाने दापोडी परिसरातून एका तरुणाला आज अटक केली. जुनेद मोहम्मद ( वय 18) असे तरुणाचे नाव आहे.हा तरुण जम्मू काश्मीरमधील एका अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता. या अतिरेकी संघटनेकडून या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.
पुणे एटीएसने दिलेल्या माहितीनूसार, गझवा ए हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने महिनाभरापुर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो या संघटनेच्या संपर्कात आला होता.
तरुणाला पैसे नेमके का पाठवण्यात आले? तो या पैशांचे काय करणार होता? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दहशतवादी कृत्यांसाठीच हे फंडिग करण्यात आल्याचा एटीएसचा आरोप आहे. आरोपीला पुणे न्यायालयात दुपारी हजर करण्यात येणार आहे.
राज्यात ६६ हजार जणांना रोजगार मिळणार, कसे ते पहा !
जुन्नर : “डोंगरची काळी मैना” पिकण्यास सुरुवात, बाजारातही दाखल
दावोस करार ; महाराष्ट्रात ६६ हजार रोजगार मिळणार !