Friday, November 22, 2024
Homeजिल्हाKolhapur : नेसरी येथील परिषदेत न्याय्य अधिकार-हक्कासाठी संविधानिक मार्गाने लढण्याचा निर्धार

Kolhapur : नेसरी येथील परिषदेत न्याय्य अधिकार-हक्कासाठी संविधानिक मार्गाने लढण्याचा निर्धार

कोल्हापूर : नेसरी येथे जगण्याच्या न्याय्य अधिकार-हक्कासाठी – राबणाऱ्या-कष्टकरी जनतेच्या, कामगार, घरेलू कामगार,भाजीपाला व फळ विक्रेते आणि शेतमजूर व अपंगांच्या न्याय्य अधिकार-हक्कासाठी लढा संविधान परिषद ही आस जगण्याची संविधान गट; आदिशक्ती संविधान गट; संविधान सन्मान परिषद आणि मुक्ती संघर्ष समिती यांच्या वतीने घेण्यात आली. (Kolhapur)

या परिषदेचे उद्गा उद्घाटन नेसरी गावच्या सरपंच गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर यांच्या हस्ते झाड लावून करण्यात येणार होते. मात्र अचानक भरपूर पाऊस सुरू झाल्यामुळे परिषदेच्या ठिकाणीच झाडाला पाणी घालून याचे उद्घाटन केले. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण सरपंच गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर; माजी सभापती अमर चव्हाण व माजी उपसभापती विद्याधर गुरबे प.स.गडहिंग्लज यांच्या हस्ते करण्यात आले. (Kolhapur)

कॉम्रेड संजय तर्डेकर, कॉम्रेड संजय घाटगे, कॉम्रेड काशिनाथ मोरे,प्रकाश गुरव,ज्ञजोतिबा गोरल, सुरेश खोत, रिजाय डिसोझा, सविता पाटील, भारती पवार, साबीर माणगावकर आणि संग्राम सावंत उपस्थित होते.

याबाबतीत ठोस पावले शासनाने व प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली पाहिजेत. यासाठी संघटित होऊन. लढा नेटाने उभा भारतीय संविधानाला घेऊन करणार आहोत. यासाठी परिषद घेत आहोत, असे भूमिका मांडताना संग्राम सावंत राज्याध्यक्ष मुक्ती संघर्ष समिती यांनी विचार व्यक्त केले. (Kolhapur)

या परिषदेचे उदघाटन भाषण करताना सरपंच,ग्रा.प.नेसरी गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर म्हणाल्या, की आपण कष्टकरी वर्गासाठी घेतलेली संविधान परिषद ही ग्रामीण भागात होत असताना एक मोलाची गोष्ट आहे. इथून पुढे मी कष्टकरी स्रीयांसाठी, संघटित-असंघटित कामगार, अपंग,विधवा परितक्त्या महिलांच्यासाठी जे काही करता येईल ते करणार आहेच.

प्रमुख पाहुणे अमर चव्हाण माजी सभापती प.स.गडहिंग्लज म्हणाले, की माणूस पण बनण्याच्या लढाई संविधानाचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. आज कष्टकरी, कामगार शेतमजूर, विधवा-परिताक्त्या महिलांसाठी ही संविधान परिषद होत आहे ही एक खूप गरजेची आणि गोरगरीब लोकांसाठी महत्त्वाची परिषद आहे. या परिषदेतून समाजातील तळागाळा पर्यंत संविधान पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे. हे करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील होऊया.

कॉम्रेड संजय तर्डेकर हे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की संविधान तळातल्या तळच्या माणसाचा विचार करते संविधान हे जात धर्म पंथ असा भेद न मानता वारकरी परंपरेमध्ये जशी समतेची आणि न्यायाची भूमिका होती तीच आजच्या संविधानामध्ये आहे त्यामुळे हे संविधान खूप महत्त्वाचे आणि गावागावातील माणसांना संविधान समजण्याची गरज आहे.

विद्याधर गुरबे माजी उपसभापती प.स.गडहिंग्लजव कॉंग्रेस नेते; प्रमोद पाटील (मुंबई) सल्लागार मुक्ती संघर्ष समिती; कॉम्रेड संजय घाटगे (सामाजिक कार्यकर्ते-आजरा) आणि कॉम्रेड काशिनाथ मोरे (सामाजिक कार्यकर्ते-आजरा) यांनी ही आपले विचार व्यक्त केले आहेत.

प्रमुख उपस्थिती म्हणून प्रकाश गुरव (सामाजिक कार्यकर्ते-नेसरी); अबुसईद माणगावकर (अध्यक्ष-शाळा समिती ऊर्दू हायस्कूल, आजरा सामाजिक कार्यकर्ते); सुरेश खोत मुक्ती संघर्ष समिती गडहिंग्लज तालुका; जोतिबा गोरल अध्यक्ष-अपंग संघटना चंदगड ; रविंद्र भोसले सामाजिक कार्यकर्ते,गडहिंग्लज तालुका; सविता पाटील, लेखिका; भारती पवार, कष्टकरी महिला संघटना नेसरी विभाग; लक्ष्मी कांबळे राज्य सदस्या महाराष्ट्रराज्य घरकामगार युनियन, महाराष्ट्र; रूजाय डिसोझा अपंग संघटना आजरा; किरण पाटील अपंग संघटना गडहिंग्लज; साबीर माणगावकर, सामाजिक कार्यकर्ते नेसरी हे होते.

परिषदेच्या शेवटी संविधानाला प्रमाण मानून शपथ घेण्यात आली. स्वागत हे कॉम्रेड धनाजी गुरव लिखित लढून मिळवलेली लोकशाही टिकवण्यासाठी हे पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कांबळे यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश गुरव यांनी केले तर आभार प्रदर्शन भारती पवार यांनी व्यक्त केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : विराट कोहली पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माचाही मोठा निर्णय

मोठी बातमी : टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा

T20 World Cup : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय

India Post : भारतीय पोस्ट मध्ये 10वी पाससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !

बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !

अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा

संबंधित लेख

लोकप्रिय