Monday, May 20, 2024
Homeआरोग्य३ जुलै पासून राज्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक जाणार संपावर? या संघटनेने...

३ जुलै पासून राज्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक जाणार संपावर? या संघटनेने घेतली कठोर भूमिका.

प्रतिनिधी :- सेंटर ऑफ ट्रेंड युनियन (सिटू) ने घेतलेल्या भूमिकेवर महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनने मागण्या मान्य न झाल्यास ३ जुलै पासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. 

          नागपूर आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन ( सिटू ) नागपूरच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, निवासी आरोग्य अधिकारी सवाई, आमदार- समिर मेघे आदींंना संपाची नोटीस सोबत मागणी पत्र देण्यात आले. १६ सप्टेंबर रोजी काढलेल्या आशा वर्कर्स च्या मानधन वाढ जी.आर नुसार मानधन वाढ, तसेच गटप्रवर्तक याना सुद्धा वाढ द्यावी. कोरोना सर्वेचे आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना रेकॉर्ड किपिंगचे ३०० रुपये रोज द्यावे. अशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.              आशा वर्कर्स यांना हत्तीरोग निर्मूलन सर्वेचे २०० रुपये, क्षयरोग निर्मूलन सर्वेचे २०० रुपये, कुष्ठरोगी शोध मोहीम ७५ रुपये, बी पी/ शुगर पेशंट शोध मोहीम ५० रुपये, कर्करोग सर्वे १०० रुपये लाभ मिळतो. परंतु कोरोना रुग्ण सर्वे करताना या विषयावर सविस्तर माहिती मागितली. परंतु केंद्राच्या १००० रुपये महिना सरसकट देण्यापलीकडे शासन काहीही न देता बळजबरीने धमक्या देऊन काम करून घेत आहे. शासनाने लवकर निर्णय घ्यावा.अन्यथा बेमुदत संप अटळ आहे. अशी माहिती जिल्हा अध्यक्ष- राजेंद्र साठे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

              निवेदन देता वेळी प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, मनीषा बारस्कर, अंजु चोपडे, लक्ष्मी ठाकूर आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय