Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यआशा सेविका व गटप्रवर्तक घालणार सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या निवासस्थानाला घेराव

आशा सेविका व गटप्रवर्तक घालणार सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या निवासस्थानाला घेराव

५ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन

मुंबई : आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांची पुर्तता दिवाळीपूूर्वी व्हावी, या मागणीसाठी दि. ५ नोव्हेंबर रोजी मंत्र्याच्या व सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या निवासस्थानी मोर्चा, धरणे आंदोलन, घेराव व तीव्र निदर्शने राज्यातील सर्व आशा स्वंयसेविका व गटप्रर्तक करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने म्हटले आहेे.

महाराष्ट्र शासनाने जुलै २०२० पासुन आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनात अनुक्रमे २००० रुपये व ३००० रुपये वाढ केलेली आहे. आदेश काढून ४ महिने होऊन गेले, तरी पण अद्याप त्याची अमंलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे ७२ हजार आशा स्वंयसेविका व ४ हजार गटप्रवर्तकांमध्ये शासनाप्रती तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. दिवाळी अवघ्या दहा दिवसावर येऊन पोहोचली आहे. दिवाळी पूर्वी मानधनवाढीची थकबाकी मिळावी, अशी आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांची मागणी आहे. 

कोवीड – १९ या महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी जिवाची पर्वा न करता शासनाकडुन वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी प्रामाणिकपणे काम करुन शासन व प्रशासनाला खंबीर साथ दिली असल्याचे संघटनेने म्हंटले आहे.

कृति समितीच्या माध्यमातून सातत्याने त्यांच्या प्रश्नांंबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे. परंतु आतापर्यंत शासनाने आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रश्नाबाबत वेळ काढूपणा केलेला आहे. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

१. जुलै २०२० पासुन आशा स्वंयसेविकांना २००० रुपये प्रतिमहा व गटप्रवर्तकांना ३००० रुपये प्रतिमहा मानधन वाढवले आहे. त्याची थकबाकी दिवाळी पुर्वी देण्यात यावी. 

२. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना वेतनश्रेणी लागु करुन सामाजिक सुरक्षेचे लाभ देण्यात यावे.

३. समान कामास समान भत्ता नुसार नागरी आणि ग्रामिण आशा स्वंयसेविकांना प्रतिदिन ३०० रुपये कोरोनाच्या कामासाठी प्रोत्सहानपर भत्ता देण्यात यावा.

४. ६२५ रुपये गटप्रवर्तकांचा बंद केलेला दैनिक भत्ता पुर्ववत तात्काळ सुरु करावा.


५. अंगणवाडी कर्मचाऱ्याप्रमाणे आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना २००० रुपये भाऊबीज भेट या दिवाळी पासून देण्यात यावी.

या मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे एम. ए. पाटील, सुवर्णा कांबळे, सलीम पटेल, भगवान देशमुख, श्रीमंत घोडके, नेत्रदीपा पाटील, रंजना गारोळे, सुमन पुजारी, स्वाती धायगुडे, राजु देसले आदींंनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय