Friday, May 3, 2024
Homeराज्यआजपासून महाराष्ट्रातील आशा, गटप्रवर्तक बेमुदत संपावर

आजपासून महाराष्ट्रातील आशा, गटप्रवर्तक बेमुदत संपावर

पुणे : आशा स्वयंसेवकांना 7 हजार व भाऊबीज तसेच गटप्रवर्तक महिलांना दरमहा 10 हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे 1500 रुपये मानधन वाढ, कंत्राटी कर्मचार्‍यांचे सर्व हक्क व भाऊबीज देण्याचा जीआर काढेपर्यंत आज शुक्रवार, 12 जानेवारीपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या घटक संघटनांनी घेतला आहे.

तसेच जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आशा गटप्रवर्तक संघटनेच्या महिलांनी संपाची नोटीस व निवेदन दिले आहे.

राज्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांनी 29 डिसेंबरपासूनच सर्व ऑनलाईन कामांवर बहिष्कार घातलेला आहे. त्यामुळे अधिकार्‍यांनी ऑनलाईन कामाबाबत सक्ती करता कामा नये. अन्यथा त्या विरोधातही आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी 18 ऑक्टोबरपासून बेमुदत संप केला होता. यासंदर्भात 8 नोव्हेंबर रोजी तडजोड झाली. त्यामध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय आदेश अद्याप मिळालेले नाहीत. या घटनेस दोन महिने झाले आहेत. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांमध्ये शासनाविरुद्ध असंतोष वाढत चालला आहे.

शासनाने संपाची दखल घेऊन मान्य केलेल्या घोषणाचा शासन निर्णय काढावा अन्यथा या संपाचा महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवर मोठा परिणाम होईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

संपाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

1. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु.२००० दिवाळीपूर्वी देण्यात येणार.

2. आशा स्वंयसेवकांच्या मोबदल्यात रु.७००० ची वाढ तत्काळ करा 

3. गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु.१०००० ची वाढ तत्काळ करा.  

वरील मागण्यांचा जीआर तत्काळ काढण्यात यावी, अशी आशा व गटप्रवर्तकांची मागणी केली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय