Saturday, May 18, 2024
Homeराजकारण"जवानांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये, या हत्येचा सूड घेतला जावा" संतप्त...

“जवानांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये, या हत्येचा सूड घेतला जावा” संतप्त असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया

(प्रतिनिधी):- भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखजवळच्या LAC वरून वाद सुरू आहे. चिनी सैन्य आणि भारतीय लष्करामध्ये झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत, तर चीनचे 43 सैनिक ठार झाले आहेत. त्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण सेवा प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्यासह तीन सेना प्रमुखांची बैठक घेतली. 

      याच पार्श्वभूमीवर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हंटले आहे की, एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये, या हत्येचा सूड घेतला जावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय