Friday, November 22, 2024
Homeराजकारणआंबेडकरवादी अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची...

आंबेडकरवादी अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची ‘एसएफआयची’ मागणी


प्रतिनिधी :- अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया वतीने राज्याध्यक्ष बालाजी कलेटवाड व राज्य सरचिटणीस रोहिदास जाधव यांनी केली आहे.

           एसएफआय ने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, “आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अरविंद बनसोड हे उच्च शिक्षित तरुण संशयास्पद मृत्यू झाला आहे. हे प्रकरण नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील पिंपळधरा गावातील आहे. यात ज्यांच्यावर आरोप लावण्यात आलेला आहे; ते मिथीलेश उमरकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असून पंचायत समिती सदस्य आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे गुन्हा दाखल करून घेताना सुध्दा राजकीय दबावापोटी बराच विलंब लागलेला आहे. केस कमकुवत करण्यासाठी कलम सुद्धा व्यवस्थित लावण्यात आलेले नाहीत. अरविंद बनसोड यांच्या विषयी पूर्वग्रह बाळगून  गॅस बुकिंग कार्यालयाच्या फोटोचे निमित्त करून प्रचंड मारहाण करण्यात आलेली आहे. ह्या प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी स्वहत्येचा प्रयत्न दाखवण्यात आलेला आहे.”

         राजकीय दबावापोटी या प्रकरणात पोलिस सुद्धा चालढकल करत असल्याचे दिसून येत असल्याने प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी लोकांवर कार्यवाही करण्याची मागणी एसएफआय’ने केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय