Saturday, May 18, 2024
HomeNewsझुरळं, पाली, माश्या, मुंग्या यामुळे वैतागलात? करून बघा १ सोपा उपाय, घर...

झुरळं, पाली, माश्या, मुंग्या यामुळे वैतागलात? करून बघा १ सोपा उपाय, घर होईल स्वच्छ- चकाचक

घरात थोडीशीही अस्वच्छता झाली किंवा स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याकडून थोडा निष्काळजीपणा झाला की घर लगेच घाण होऊन जातं. आणि अशा घरात मग झुरळं, पाली, माश्या, मुंग्या अशा वेगवेगळ्या किटकांचा सुळसुळाट होतो.
आरोग्याच्या दृष्टीनेही असे किटक घरात असणं काही बरं नाही. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त कसा करायचा? (How to get rid of cockroach, house flies, chipkali?) असा प्रश्न पडला असेल तर हा एक घरगुती उपाय करून बघा. (home made disinfectant phenyl)

बऱ्याचदा या किटकांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण घरात जे रसायनं फवारतो, ते लहान मुलांसाठी घातक असतात. त्यामुळे मुलं घरात असतील तर अशा रसायनांचा वापर करायला भीती वाटते. म्हणूनच घरातलंच काही साहित्य वापरून तयार करण्यात आलेलं हे एक घरगुती लिक्विड यासाठी उत्तम पर्याय ठरतो.

घराच्या स्वच्छतेसाठी घरगुती लिक्विड तयार करण्याची पद्धत


१. ४ ते ५ लिंबू घ्या आणि ते मधोमध कापून त्याचे प्रत्येकी २- २ काप करून घ्या.

२. लिंबाच्या फोडी आणि २ टेबलस्पून वॉशिंग पावडर हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.

३. त्यानंतर गाळणीतून हे मिश्रण गाळून घ्या. गाळून घेतलेल्या पाण्यात २ चमचे मीठ आणि १ चमचा बेकिंग सोडा टाका.

४. त्यानंतर त्यामध्ये ३ चमचे व्हिनेगर आणि ३ चमचे डेटॉल लिक्विड टाका.

५. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

कसा करायचा वापर?


१. ज्या ठिकाणी झुरळ, पाली, मुंग्या नेहमीच असतात, अशा ठिकाणी आपण तयार केलेल्या घरगुती फिनेलमध्ये बुडवलेला एक कापडाचा बोळा ठेवून द्या.

२. दररोज स्वयंपाक झाल्यावर ओटा पुसण्यासाठीही या फिनेलचा वापर करू शकता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय