कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संपास कोल्हापूरात सुरूवात झाली असून आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून गुरूवारी (दि.२३) रोजी अंगणवाडी सेविका व मदतनीस जिल्ह्यातील खासदारांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार आहेत.
अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या भरीव मानधन वाढ, मराठीतून पोषण ट्रेकर, ग्रॅच्युइटी या व इतर मागण्यांसाठी राज्यातील दोन लाख सेविका, मदतनीस बेमुदत संपावर गेल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी 100 % सहभाग घेतला.
या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून येत्या गुरुवारी सेविका व मदतनीस या कोल्हापूर चे खासदार संजय मंडलिक, हातकणंगले चे खासदार धैर्यशील माने, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी मोर्चा काढून आपल्या मागण्या मांडणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे कॉम्रेड आप्पा पाटील, कॉम्रेड जयश्री पाटील, कॉम्रेड सतीश कांबळे, रघुनाथ कांबळे, शुभांगी पाटील. शोभा भंडारे, विद्या कांबळे, शमा पठाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.