आंबेगाव (पुणे) : तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून नागरिकांना त्वरित उपचार मिळावे याची खबरदारी घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार शिणोली येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह येथे १०० रुग्णांचे कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्यात आले.
कोव्हीड केअर सेंटरचे उद्घाटन शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर यांच्या हस्ते करण्यात आले.
शिणोली येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून याची क्षमता सध्या १०० रुग्णांची करण्यात आली आहे. गरज पडल्यास अजून वाढवली जाणार आहे. येथे वसतिगृह असल्याने वेगवेगळ्या स्वतंत्र खोल्या असून प्रत्येक खोलीला स्वच्छतागृह असल्याचे सभापती संजय गवारी यांनी सांगितले.
याप्रसंगी तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कुटे, माजी सभापती कैलास काळे, नंदकुमार सोनवले, जिल्हा परिषद सदस्या रूपाली जगदाळे, मधूकर बोऱ्हाडे, दत्ता थोरात, नीलकंठ काळे, सरपंच शकुंंतला काळे, उपसरपंच सुनील बोऱ्हाडे, डी. बी.बोऱ्हाडे, योगेश पडाळे, दिपक हरण, जनार्दन नाईकडे हे उपस्थित होते.