Friday, May 17, 2024
Homeसमाजकारणआंबेगाव : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने जखमी पेशंट ला 7 लाख...

आंबेगाव : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने जखमी पेशंट ला 7 लाख 75 हजार रुपये रकमेचा मदतीचा हात

आंबेगाव :  शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आंबेगाव तालुक्याचा वतीने 7 लाख 75 हजार रुपये रकमेचा पेशंट सचिन शांताराम चव्हाण ( रा.अवसरी बु ) यांना  मदतीचा हात दिला.

महाराष्ट्र राज्याचे नगरविकास/बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व खासदार शिवसेना उपनेते खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वंदनीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे व राजभाऊ भिलारे ( शहरप्रमुख पुणे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ) व देविदास आढळराव पाटील ( शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आंबेगाव समन्वयक ) यांच्या सूचनेनुसार सदर मदतीचा हात देण्यात आला.

सचिन शांताराम चव्हाण या पेशंटच्या अंगावरती तोक्ते चक्रीवादळामध्ये शिळफाटा ठाणे या ठिकाणी या वादळामधी रस्त्याच्या कडेला असलेले होर्डिंग चालू पिक -अप वरती पडून अपघात झालेला होता. या पेशंटला हार्दिक हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू असताना हॉस्पिटलच्या बिलासाठी एकूण रक्कम रुपये 7 लाख 75 हजार रुपये मिळवून देण्यासाठी देण्यासाठी शिवसेना उपनेते खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना कॉल करून माहिती दिली असता आंबेगाव तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका समन्वयक देविदास आढळराव पाटील यांनी सदर विषयी पाठपुरावा करून मदत मिळवून दिली.

तसेच या कामी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अजित चव्हाण, ग्रा.प.सदस्य स्वप्निल हिंगे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मंचर शहर समन्वयक आकाश मोरडे यांचे सहकार्य लाभले. या पुढेही महागड्या शस्त्रक्रिया मोफत करण्याचे काम शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा वतीने करण्यात येईल, असेही सांगितले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय