बार्शी : केंद्र सरकारणे शेतकरी विरोधी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक 2020, शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी आणि कृषी सेवा करार विधेयक 2020, अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक 2020 हे 3 कायद्यांच्या विरोधात व दिल्ली आंदोलनाला पठिंबा देण्यासाठी बार्शीमध्ये मार्केट यार्ड ते तहसील कचेरी असा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार प्रदिप शेलार यांच्यामार्फत पंतप्रधान व केंद्रीय कृषीमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी काॅम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, आरएसएसची विचारधारा जपणारे हे सरकार भांडवलदारी विचारधारेचे असल्याने त्यांना शेतकऱ्याच्या जमिनींचे कंपनीकरण करून शेतकरी उध्वस्त करून टाकायचा आहे, परंतु देशातील शेतकरी या कटाविरोधात चिकाटीचा लढा लढतील. तर भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, भाजपा ही शेतकर्यांची लूट करण्याच्या उद्देशाने हे कायदे करीत आहे या विरोधात शेतकरी वर्गासोबत राहू.
या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहूजन आघाडी, अंंधश्रध्दा निर्मूलन समिती, समता परिषद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भरीप, संभाजी बिग्रेड, इंटक संलग्न राष्ट्रीय गिरणी कामागर संघ, आयटक, डाॅ. जगदाळे मामा हाॅस्पीटल श्रमिक संघ, आयटक बांधकाम कामगार संघटना, आॅल इंडिया स्टुडंन्टस फेडरेशन, कन्फेडरेशन युनियन, मूलनिवासी, उडाण फाउंडेशन, राष्ट्रवादी लिगल सेल, एमआयएम, आदिवासी संघटना सहभागी झाल्या होत्या.
मोर्च्यामध्ये नागेष अक्कलकोटे, अॅड. सुप्रिया गुंड, अॅड. आरगडे मॅडम, दिपक आंधळकर, लक्ष्मण घाडगे, प्रा. काॅ. एस.एस.जाधव, प्रा. डाॅ. अशोक कदम, अॅड. विक्रम सावळे, प्रविण मस्तुद, आनंद काशिद, शौकष शेख आदीसह सहभागी झाले होते.