Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणवडवणी बंद मध्ये माकपचा सक्रिय सहभाग व पाठींबा

वडवणी बंद मध्ये माकपचा सक्रिय सहभाग व पाठींबा

वडवणी  : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद मध्ये आज वडवणी येथे सर्वपक्षीय वडवणी बंद ठेवण्यात आली यावेळी व्यापारी, शेतकरी, व नागरिकांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. 

यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने देखील सक्रिय सहभाग नोंदवला व शेतकरी विरोधी तीन काळे कायदे तात्काळ रद्द करा ही मागणी करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तहसीलदार यांना निवेदन देऊन भारत बंद मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला व पाठिंबा दिला. 

यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी कॉ. रवी उरूनकर, कॉ. शंकर टिपरे, अंकुश खारगे, गोविंद लोकरे आदी सहभागी होते.

संबंधित लेख

लोकप्रिय