Monday, September 30, 2024
HomeNewsऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM )-पिंपरीत प्रजासत्ताक दिन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM )-पिंपरीत प्रजासत्ताक दिन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन खराळवाडी येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM )पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि लहान 100 लहान मुलांना खाऊ चे (किट) वाटप करण्यात आले . (AIMIM ) पक्षाचे महासचिव महाराष्ट्र राज्य मा. अकिल भाई मुजावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन दिपक कांबळे ( उप शहर अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर ) यांनी केले

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती फेयाझ शेख (पुणे जिल्हा अध्यक्ष ) धम्मराज साळवे (शहराध्यक्ष) रूहिनाझ शेख (महिला शहर अध्यक्ष) कुतूबुद्दीन होबळे , हाजी हाफिज बकर , सद्दाम हुसेन, खालिद मुजावर, ज्ञानेश्वर कांबळे AIMIM पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय