Panipuri : महाराष्ट्र राज्य, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र तसेच विद्या प्रतिष्ठानचे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त माध्यमातून करिअर कट्टा अंतर्गत करिअर उद्योजक संसद ची स्थापना करण्यात आली. उद्योजक हा एका रात्रीतून घडत नसतो. तो येणाऱ्या आव्हानांचा सामना करत त्यातून मार्ग काढत अनुभवाच्या जोरावर रोज घडत जातो. यासाठी तुमच्या जवळ असणाऱ्या साधनसामग्रीवर व ज्ञानावर विश्वास ठेऊन सुरुवात करा, जिद्द बाळगा, होणाऱ्या चुका सुधारा, मागच्या चुकांमधून नवीन शिका, असे केल्यास नक्कीच उद्योजकतेचे रोपटे वटवृक्षात रुपांतरित झाल्याशिवाय राहणार नाही ही शिकवण करिअर उद्योजक संसद विद्यार्थ्यांना देत आहे.
आंतरराष्ट्रीय भरड धान्य २०२२-२३ चे औचित्य साधून भरड धान्यांपासून बनविलेली चाटपुरी साठी अन्न तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थीनीना प्रसारित करण्यासाठी माध्यम मिळत नव्हते. अन्न तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख प्रा. सुजाता पाटील यांनी त्यांना करिअर उद्योजक संसद बद्दल ओळख करून दिली. करिअर उद्योजक संसदमध्ये उद्योजकांची निवड करण्यासाठी स्पर्धा घेतली गेली. महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष माननीय यशवंत शितोळे सर व करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. सुनील ओगले यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक गटांची निवड करण्यात आली.
डॉ. सुनिल ओगले आणि अन्न तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. सुजाता पाटील यांनी उदयोजकांची मिटिंग घेऊन करिअर उदयोजक संसदबद्दल माहिती दिली. करिअर उद्योजक संसद अंतर्गत भरड धान्य चाटपुरी स्टार्टअप उभारण्यासाठी ५०००।- ही रक्कम उद्योजक विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच ही रक्कम दुप्पट करण्याचे आव्हान दिले. या उद्योजकांनी स्टार्टअपची सुरुवात महाविद्यालयात घेण्यात आलेल्या फुड फेस्टिवल पासून केली. यानंतर त्यांनी सुभद्रा मॉल समोर एका छोट्या टेबलवर या विद्यार्थ्यांनी स्टॉल लावायला सुरुवात केली. भरड धान्यांपासून बनविलेले चाटपुरी मार्केटमध्ये नवीन असल्यामुळे सर्वाना त्याची ओळख करून द्यावी लागली. तसेच हे उद्योजक विद्यार्थी मुली असल्यांमुळे अनेक गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागले.(Panipuri)
या दरम्यान बऱ्याच सुशिक्षित लोकांनी या स्टॉलला भेट दिली आणि भरपूर मार्गदर्शन केले. हा प्रवास सुरु असताना सुभद्रा मॉलच्या आतमध्ये हा स्टॉल लावावा अशी कल्पना त्यांना देण्यात आली. त्या नंतर पाटील मॅडमशी बोलून परवानगीसाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. या नंतर मॅडम नि मॉल च्या मॅनेजर सोबत बोलून त्यांना परवानगी मिळवून दिली. त्यांना ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम मिळून एका महिन्याच्या आत या उद्योजकांनी ५००० रुपयाचे १५००० रुपये करून हे आव्हान पूर्ण केले. येणाऱ्या काळात या तीन मुली साक्षी जाधव, स्नेहल केचे व अक्षदा मखर या नवउद्योजिका चाटपूरी चा प्रिमिक्स करून जगाच्या पाठीवर पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
Panipuri
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले