Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडअलंकापुरी संत लीलाभूमी सिद्धबेट विकासात वृक्षारोपण संवर्धनास प्रारंभ

अलंकापुरी संत लीलाभूमी सिद्धबेट विकासात वृक्षारोपण संवर्धनास प्रारंभ

आळंदी नगरपरिषद व आरंभ फाउंडेशनचा उपक्रम

आळंदी : येथील आळंदी नगरपरिषद हद्दीतील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात विकसित होत असलेले भाविकांचे श्रद्धास्थान आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन पुरातन श्रीक्षेत्र आळंदी सिद्धबेट संतभूमी राज्य शासन आणि आळंदी नगरपरिषद यांच्या माध्यमातून विकसित होत आहे. या भागात प्रभावी देखभाल दुरुस्ती, स्वच्छता, वृक्षारोपण, सुशोभीकरण करण्याच्या कार्यास आरंभ फाऊंडेशनने आळंदी नगरपरिषदेच्या मार्गदर्शनात सुरुवात केली. 

आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचे मार्गदर्शनात विविध विकास कामे करण्यासाठी आरंभ फाऊंडेशनने तयारी दर्शवित कामकाजास सुरुवात केली. या कामाचे भूमिपूजन आरंभ फाउंडेशनच्या वतीने वैष्णवी पाटील आणि आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे हस्ते झाले. प्रसंगी आरंभ फाउंडेशनचे विनायक पाटील, आळंदी समन्वयक अर्जुन मेदनकर, संत तुकडोजी महाराज युवा मंच पुणेचे सुरेश देसाई, आर्ट ऑफ लिविंगचे दत्तात्रय राठोडे, तानाजी भोसले, प्रवीण थोरवे, गजानन पाटील, अनिरुद्ध देसाई, आदित्य जताले, मयुरी कोकणे, मानसी पंडित, रितेश अत्तरदे आदी उपस्थित होते. 

दक्षिणी कमांड पुणे येथे लघुलेखक, कुक, सफाईवाला, चौकीदार पदांसाठी भरती, 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

ज्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार, मंदिरे, घाट बांधले अशा पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आरंभ फाउंडेशनच्या माध्यमातून संत लीला भूमी असलेल्या सिध्दबेटात वृक्षारोपणासह विविध विकास कामास भूमिपूजन करून जेसीबी यंत्राचे साहाय्याने कार्यास सुरुवात करण्यात आली. आळंदीतील या सामाजिक उपक्रमात आरंभ फाउंडेशन समवेत आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, देहू रानजाई प्रकल्पाचे प्रमुख सोमनाथ मसूडगे, आळंदी नगरपरिषद, यशवंत संघर्ष सेना, नेचर फाउंडेशन सहभागी झाले आहेत.

प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू करण्यात आले आहे. यात येथील बेटाचे वैभव वाढविण्यासाठी चर्चा करण्यात आली. आरंभच्या प्रमुख वैष्णवी पाटील आदींनी सुसंवाद साधला. यात देहूतील रानजाई प्रकल्पाचे सोमनाथ मसुडगे, संत तुकडोजी महाराज विचार मंच पुणे सुरेश देसाई, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, गोविंद गोरे, निसर्ग राजा मित्र जीवांचे प्रशांत राऊळ, माणिक धर्माधिकारी, मारुती साळुंखे, उद्योजक दत्तात्रय राठोड  उपस्थित होते. 

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय, यापुढे ‘या’ तारखेला साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’

आरंभ फाउंडेशनच्या वतीने वैष्णवी पाटील म्हणाल्या सिद्धबेट विकास आणि सुशोभित करण्यासाठी सेवाभावी संस्थानी या मोहिमेत सहभागी व्हावे. या उपक्रमातून आळंदीतील तीर्थक्षेत्रात सेवा देण्याचे भाग्य लाभणार आहे. याचे समाधान मिळत आहे. सिद्धबेटातील स्वच्छतेचे, पर्यावरण संवर्धनाचे तसचे सुशोभीकरणाचे कार्य हाती घेतले आहेत. या कार्यात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आणि 6 जून शिवराज्याभिषेक दिनी ज्ञानेश्वर माऊलींचे निवासस्थान असलेल्या सिद्धबेट तीर्थक्षेत्री वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तरी सर्व निसर्गप्रेमी, भाविक, नागरिक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !

मेगा भरती : भारतीय डाक विभागात 38926 पदांची मोठी भरती, तत्काळ अर्ज करा !


संबंधित लेख

लोकप्रिय