Friday, December 27, 2024
Homeकृषीसुरगाणा : मांधा येथे चारा प्रक्रियेवर कृषी विद्यार्थ्यांचे शेतक-यांना मार्गदर्शन

सुरगाणा : मांधा येथे चारा प्रक्रियेवर कृषी विद्यार्थ्यांचे शेतक-यांना मार्गदर्शन

सुरगाणा / दौलत चौधरी : आदिवासी  अतिदुर्गम भागातील कोरडवाहू शेती करण्या बरोबरच दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन करणे हे केले जाते. तालुक्यात मांधा, रघतविहीर, कुकूडणे, पांगारणे, पिंपळसोंड, खुंटविहिर, मालगोंदे चिंचमाळ या सिमावर्ती भागात शेती व्यवसाबरोबर दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी मोठा योगदान ठरणारा व्यवसाय. याकरीता जनावरांना लागणारा चारा ( गवत ) उत्कृष्ट प्रकारे पौष्टिक कसे तयार करावे त्यातून दुधाचे प्रमाण कशा प्रकारे वाढवले जाते, याविषयी कृषि विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

तालुक्यातील मांधा व गुही या गावातील शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालया तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषि औद्योगिक संलग्नता’ या कार्यक्रमांतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार येथील कृषिदूत हर्षद ठाकरे व कृषिकन्या हर्षाली संसारे या विद्यार्थ्यांनी ‘चारा प्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

वाळलेल्या चाऱ्यावर प्रकिया करून त्यांची पौष्टिकता कशी वाढवायची व दुधाचे उत्पादन कशा प्रकारचे वाढवायचे याचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच चाराप्रकिया करतांना चाऱ्याचे प्रमाण किती, कसे घ्यावे व त्यात कोणकोणते घटक टाकायचे, याचे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखवण्यात आले. 

यावेळी शेतकरी पशुपालक हरी सहारे, भाऊसाहेब सहारे, सुकर ठाकरे, तुळशीराम पवार, वसंत मोरे, सुरेश गावित, लक्ष्मण गावित, गहना गवळी व अन्य शेतकरी उपस्थित होते.

“आमच्या गावातील कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आम्हां ग्रामस्थांना वाळलेल्या चा-यावर कशी प्रकिया करून त्याची पौष्टिकता वाढवावी या बाबतीत मार्गदर्शन केले. यापुर्वी पारंपरिक पद्धतीने गायींना कोरडा चारा टाकत होतो. त्यामुळे गवताची नासाडी होत असे. हि पद्धत निश्चितच दुग्ध वाढीसाठी उपयुक्त ठरेल.”

 

– तुळशीराम महाले, सरपंच मांधा


संबंधित लेख

लोकप्रिय