Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणसुरगाणा : 'एक झाड लेकीचे' उपक्रमास प्रारंभ, जिल्ह्यातील अभिनव उपक्रम

सुरगाणा : ‘एक झाड लेकीचे’ उपक्रमास प्रारंभ, जिल्ह्यातील अभिनव उपक्रम

spot_imgspot_imgspot_imgspot_img

निसर्गाचे सवर्धन काळाची गरज – गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी

‘माझा प्राणवायू, माझी जबाबदारी’

 

सुरगाणा / दौलत चौधरी : एका झाडाचे महत्व काय असते हे कोरोना सारख्या महामारीच्या काळात ऑक्सिजन घटक किती महत्वाचा ठरला आहे. या ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे. दिवसें दिवस जगलांचा होणारा ऱ्हास, चोरटी जंगलतोड, वृक्ष संवर्धन आणि संगोपन नामशेष होत चालले आहे. यामुळे अनेक जंगलांचा -हास होत चालला आहे. निसर्गाने दिलेली देणगी फक्त नावापुरतीच जंगलांच्या तालुक्यात उरली आहे. जंगलांचे संवर्धन व संगोपनासाठी आज काळाची गरज निर्माण झाली असून यासाठी सर्वांनीची पुढाकार घ्यावा यासाठी ‘माझा प्राणवायू, माझी जबाबदारी’ प्रत्येकाने वृक्ष लागवड करुन स्विकारावी असे आवाहन सुरगाणा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी केले.

खोकरी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात वृक्षारोपण प्रसंगी करण्यात आले. सभापती मनिषा महाले व जलपरिषद मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक झाड लेकीचे’ या उपक्रमाच्या वृक्षारोपण प्रसंगी ते बोलत होते.

जलपरिषद मित्र परिवाराने त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा सारख्या आदिवासी बहुल भागांत ग्रामस्थांच्या व शालेय शिक्षक, विद्यार्थ्यांना श्रमदानातून वृक्ष लागवड, जनजागृती मोहीम हाती घेत हजारो विविध जातींच्या  झाडांचे वृक्षारोपण केले आहे. ही बाब अभिमानस्पद आहे. वृक्ष लागवडीच्या पायंड्याबरोबरच जलपरिषदने ‘एक झाड लेकीचे’ उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाची सुरुवात सभापती मनिषा महाले यांनी केली आहे.

सुरगाणा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक रमेश धुम यांची नात ज्ञानेश्वरी प्रमोद धुम हिच्या नावे तसेच शालेय विद्यार्थीनी 

रुपाली धुम, खुशी धुम, प्रतीक्षा गावित, गीता निंबारे, पूजा गावित, रोशनी देवळे, अनुसया धुम या विद्यार्थिनींच्या नावे शेवगा, पिंपळ, चिकू, सीताफळ, आंबा, काजू, पेरू, बोर अशी फळझाडे जातीच्या १०१ वृक्षांची मुलीच्या हस्ते शालेय आवारात, शेतात, घर, बांधावर, रस्त्याच्या दुतर्फा लागवड करण्यात आली आहे. 

खोकरी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात अडीचशे पेक्षा जास्त झाडांचे संगोपन शिक्षकांनी केल्याने परिसर आल्हाददायक व    उन्हाळ्यात सावलीमय झाला आहे. यावेळी मुख्याध्यापक रमेश धुम, तुकाराम भोये, पांडूरंग पवार, हरिश्चंद्र गावित, नामदेव चौधरी, महेंद्र कडवा, नारायण गवळी जलपरिषदेचे सदस्य योगेश महाले, रतन चौधरी आदी उपस्थित होते.

“निसर्गाच्या संवर्धना करीता सर्वांनी वृक्षारोपण करत हिरारीने सहभाग नोंदवावा; पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही ‘एक झाड लेकीचे’ हा उपक्रम राबविला जात आहे. याला शाळा, संस्था, कार्यालय तसेच जलपरिषद मित्र परिवाराच्या या सुत्य उपक्रम प्रेरणादायी असून तालुक्यात वृक्ष वाढीसाठी भर घालणारा आहे. सर्वांनीच या उपक्रमात सहभागी होत मुलींच्या नावे वृक्ष लागवड करण्यात आली आहे.”

– तुकाराम भोये, वृक्ष प्रेमी शिक्षक.

      

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय