Friday, November 22, 2024
Homeकृषीमोठी बातमी : दूध आंदोलनानंतर शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्यासह अनेक...

मोठी बातमी : दूध आंदोलनानंतर शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. वाचा सविस्तर.

अकोले : शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर अकोले पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दूध आंदोलन दडपण्यासाठी सरकार हे करत असल्याची टिका होत आहे.

कालच्या दूध आंदोलनाला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद ! माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल! सरकारचे शतशः आभार !

डॉ.अजित नवले, राज्य सरचिटणीस –

अखिल भारतीय किसान सभा.

दुधाला प्रति लीटर तीस रुपये दर मिळावा, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा, तसेच दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर दहा रुपये अनुदान वर्ग करण्यात यावे, इत्यादी मागण्यांसाठी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सातत्याने आंदोलन करत आहे.

गेली तीन महिने सातत्याने पत्रव्यवहार करूनही सरकार दाद देताना दिसत नाही. सरकार फक्त चर्चेतून वेळ काढू भूमिका घेताना दिसत आहे. यामुळे किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करत इशारा दिला होता. त्याच आंदोलनाचा धसका घेत सरकारने हे पाऊल उचलले असल्याची टिका होत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय